रहदारीच्या ठिकाणी वाहन थाबून रहदारीस त्रास दिल्या बद्दल त्या ऑटो चालकच्या विरोधात फिर्याद दाखल

 रहदारीच्या ठिकाणी वाहन थाबून रहदारीस त्रास दिल्या बद्दल त्या 

ऑटो चालकच्या विरोधात शिवाजी नगर येथील पोलीस ठाणे येथे  फिर्याद दाखल

सविस्तर वर्णन असे की 

मी शाम मुंजाजी कच्छवे,  पोलीस स्टेशन शिवाजी नगर, लातुर मो .नं. . वरील ठिकाणी गेले एक वर्षापासुन नेमणुकीस आहे.


मी सरकार तर्फे फिर्यादी होउन फिर्याद लिहुन देतो की, आज दि. 15/07/2023 रोजी मी सकाळी 08.00 वाजता मी नेहमी प्रमाणे पोस्टेस दिवसपाळी कर्तव्यासाठी हजेरीवर हजर आलो. मा.पो.नि.सो यांचे आदेशाने मला व पोकॉ. १४३६ लहाने यांना पोलीस स्टेशन हददीत अवैध प्रवाशी वाहतुक करणाऱ्या वाहनावर तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनावर कार्यवाही करण्याचे कर्तव्यास नेमण्यात आले. त्याप्रमाणे आम्ही शिवाजी चौक ते रेणापुर नाका जाणारे रोडवर ऑटो पाइंटचे कॉर्नरवर लातुर • येथे 08.30 वाजण्याचे दरम्यान माझे ड्युटीवर असताना एक प्रवाशी ऑटो नं. MH-24 AT-3633 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील ऑटो वाहन हे प्रवाशी वाहतुक करण्याकरीता शिवाजी चौक ते रेणापुर नाका जाणारे रोडवर ऑटो पॉइट चे कॉर्नरवर लातुर येथे मधोमध उभा करुन रहदारीस मोठया प्रमाणात अडथळा करुन स्वताःच्या व इतरांच्या जिवीतास धोका निर्माण होइल अशा बेशिस्त स्थितीत प्रवाशी वाहतुक करण्याकरीता थांबलेला मिळुन आला. आम्ही त्या सदरील ऑटो चालकास त्याच्या ताब्यातील ऑटो वाहन रोडचे कडेला घेण्यास सांगुन त्यास त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव देविदास वालाजी तळीकर, वय 22 वर्षे, रा. रेणुका नगर, अंबाजोगाई रोड, लातूर असे सांगीतले आम्ही सदरील ऑटो चालकास ताब्यात घेवुन पो.स्टे. शिवाजी नगर लातुर येथे ऑटोसह हजर केले आहे.

तरी माझी ऑटो नं. MH-24 AT-3633चा चालक नामे देविदास वालाजी तळीकर, वय 22 वर्षे, रा. रेणुका नगर, अंबाजोगाई रोड, लातुर याचे विरुध्द कलम 283 भादंवि प्रमाणे कायदेशिर फिर्याद आहे.

सदरील FIR 412 खाली दर्शविला आहे

 




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने