उदगीर : शहरातील निडेबन वेस येथील एका २५ वर्षीय विवाहितेला माहेरहून घर बांधकामासाठी ५ लाख रुपये घेऊन ये म्हणून मानसिक, शारीरिक छळ केल्याची घटना घडली. या प्रकरणी मंगळवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, १९ मे २०२० पासून आजतागायत उदगीर
शहरातील निडेबन वेस येथील विवाहिता तेजस्विनी सचिन भाले यांना तुला मुलगी झाली, मला मुलगा पाहिजे होता, या कारणावरून सासरच्या मंडळीने त्रास दिला.
घर बांधकामासाठी माहेरहून ५ लाख रुपये घेऊन ये म्हणून जाच जुलूम करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. माझ्या घरी आलीस तर तुला खतम करून टाकतो म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी तेजस्विनी सचिन भाले यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलिस ठाण्यात सचिन कोंडीराम भाले, कोंडीराम गणपतराव भाले, सतीश कोंडीराम भाले, सुप्रिया दुषांत शिंदे, विद्या ब्रिजभूषण गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सरफराज गोलंदाज करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा