लातूर: हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळावी म्हणून शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पौकविमा योजना राबविण्यात येते, पीकविम्याच्या हप्त्याच्या रकमेचा शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येऊ नये म्हणून राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, यंदाच्या रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातून प्रस्ताव कमी झाले आहेत.
१ रुपयात पीकविमा
पीकविम्याच्या हप्त्याची
रक्कम केंद्र, राज्य शासनाबरोबर
शेतकऱ्यांनाही भरावी लागत होती. गतवर्षीपासून राज्य शासनाने शेतकऱ्याऱ्यांचा हप्ता भरण्यास सुरुवात केली आहे. केवळ एक रुपया भरून सहभाग नोंदवायचा होता.
तीन लाख हेक्टरचा विमा
१५ डिसेंबरची होती मुदत
रब्बी हंगामातील गहू, हरभरा यां पिकांचा विमा उतरविण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत होती. दरम्यान, अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे म्हणून शासनाने एक दिवसाची मुदत वाढविली होती.
जिल्ह्यात यंदा रब्बीचा पेरा वाढला असून १२४ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील ३ लाख ८४ हजार ७८१ शेतकऱ्यानी पीकविमा योजनेत सहभागी होत ३ लाख ११ हजार ८८८ हेक्टरवरील पीक संरक्षित केले आहे.
कोणत्या तालुक्यात किती अर्ज?
अर्ज
लातूर ४१,५५७
अहमदपूर ॥८४,८८२
निलंगा ५२,१६३
औसा ६०,८३८
रेणापूर ३९,१७८
चाकूर ३४.५९४
शिरूर अनं.१४,७०५
देवणी १३.२५६
उदगीर २४,९६६
जळकोट १८,६४२
एकूण ३,८४,७८१
दीड लाख अर्ज कमी...
पीकविमा ऐच्छिकः
एक रुपयात पीकविमा योजना असल्याने अधिक शेतकरी सहभागी होतील, अशी आशा होती. परंतु, गतवर्षीच्या रबी हंगामाच्या तुलनेत यंदा १ लाख ५१ हजार ५८३ अर्ज कंमी दाखल झाले आहेत.
प्रधानमंत्री पीकविमा
योजनेची प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती करण्यात आली होती. मात्र, पीकविमा भरणे हे ऐच्छिक आहे. - रमेश
टिप्पणी पोस्ट करा