828 midc latur 2024

फिर्याद

दि. 19/11/2024

भी नानासाहेब अंगद भौग वय 45 वर्षे, पोह/1247 नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, लातूर मो.नं. 9881131247.

सरकार तर्फे फिर्यादी होऊन फिर्याद देतो की, मी स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथे पोलीस हवालदार म्हणुन गेल्या 14 वर्षापासुन नेमणुकीस आहे.

आज दिनांक 19/11/2024 रोजी मा. पोलीस निरीक्षक, स्थागुशा लातूर यांचे आदेशांने मी सोबत पोह/1445 स्वामी, चापोकॉ/1634 चोपणे असे सर्वजण लातुर शहरात विधानसभा निवडणुक -2024 चे अनुषंगाने 21.00 वाजेपासुन शासकिय वाहन एमएच 24 एडब्ब्न्यु 9340 मध्ये पेट्रोलींग करीत असतांना जुना रेणापुर नाका येथे आलो असता आम्हास गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, नविन रेणापुर नाका येथील मनपाचे पाणी फिल्टरचे समोर रोडच्या साईडला इसम नामे दत्ता चव्हाण नावाचा इसम काळया रंगाचे जॉकेट व एक नाईट पॅन्ट असा पोशाख परिधान करून त्याचे जवळील स्कुटीचे डिग्गीमध्ये ठेवून अवैध रित्या देशी दारुची चोटरी विक्री करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने आम्ही लागलीच जप्ती पंचनाम्यातील दोन पंचाना बोलावून घेऊन त्यांना मिळालेली माहिती कळवून पंच म्हणून हाजर राहण्यास कळविले असता त्यांनी होकार दिल्याने आम्ही पोलीस व पंच मिळालेल्या बातमी प्रमाणे नविन रेणापुर नाका येथील नविन रेणापुर नाका येथील मनपाचे पाणी फिल्टरचे समोर रोडच्या साईडला निशानदेही प्रमाणे एक इसम स्कुटीजवळ थांबलेला दिसला आम्ही त्यास पंचासमक्ष 22.35 वाजण्याचे सुमारास ताब्यात घेवुन त्याचे आमची व पंचाची ओळख करून देवुन आमची अंगझडती घेणेबाबत विचारणा केली असता त्यांने नकार दिला त्यास पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्यानी त्यांचे नावे दता नरसिंग चव्हाण वय 31 वर्षे रा.नविन रेणापुर नाका, भक्ती नगर लातुर असे असल्याचे सांगीतले त्यानंतर आम्ही पंचासमक्ष त्यास झडतीचा उद्देश कळवुन त्याचेजवळ असलेल्या aprilia कंपनीचे स्कुटी क्र. एमएच 23 एक्यु 6669 चे द्विगीची पाहणी केली असता त्याचे स्कुटीचे डिग्गीमध्ये के. के. कलेक्शन असे नाव असलेल्या पांढ-या रंगाचे पिशवीमध्ये देशी दारु टॅगोपंच कंपनीचे 90 एमएलचे 23 सिलबंद बाटल्या मिळून आल्या त्यानंतर इसम नामे दत्ता चव्हाण याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टचे उजव्या बाजुचे खिशामध्ये रोख रक्कम मिळुन आली. त्यानंतर आम्ही घराकडे जावुन त्याचे घरासमोर असलेल्या कारमध्ये प्रो गुन्हयाचा माल आहे काय याबाबत खात्री केली असता त्यामध्ये आणखीन माल मिळून आला नाही. सदर पिशवीमध्ये पो. गुन्ह्याचा माल मिळून आल्याने त्यास सदर प्रो. गुन्ह्याचा माल बाळगण्याचा पास परवाना आहे किंवा कसे या बाबत विचारता त्यांनी पास परवाना नसल्याचे सांगीतलेने सदर पांढ-या रंगाच्या पोत्यामध्ये प्रो. गुन्ह्याच्या मालाचे व रोख रक्कमेचे पंचासमक्ष आवलोकन केले असता त्याचे वर्णन खालील प्रमाणे.

1

805-00

इसम नामे दत्ता चव्हाण याचेजवळील aprilia कंपनीचे स्कूटी क्र. एमएच 23 एक्यु 6669 स्कुटीचे डिगीमध्ये के, के, कलेक्शन असे नाव असलेल्या पांढ-या रंगाचे पिशवीमध्ये देशी दारु टॅगोपंच कंपनीचे १० एमएलचे 23 सिलबंद बाटल्या प्रती बॉटल किं. 35 रुपये प्रमाणे किं.अ.

2

35,000-00

एक साल काळया रंगाधी aprilia कंपनीचे स्कूटी क्र. एमएच 23 एक्यू 6669 चे डिगीमध्ये देशी दारुच्या बाटल्या ठेवून अवैध रित्या घोरटी विक्री करणेकरीता वापरण्यात आलेली स्कुटी किं. अं.

35,000/- रु.

3 1970-00

इसम नामे दता चव्हाण यांने देशी दारु टैंगोपंच याची अवैध रित्या चोरटी विक्री करुन त्यामधुन मिळालेली रोख रक्कम 1970/- रुपये ज्यामध्ये 500/- रुपये दराच्या 03 चलनी नोटा, 200/- रुपये दराची 01 चलनी नोट, 100/- रुपये दराच्या 02 चलनी नोटा, 50/- रुपये दराची 01 नोट व 20/- रुपये दराची 01 नोट असे एकुण 1970/- रुपये

एकूण:-31,775/- रुपयाचा मु‌द्देमाल

येणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किमतीचा प्रो गुन्हयाचा माल मिळून आल्याने तो पंचासमक्ष ताब्यात घेवुन त्यातील एक प्लॉस्टीक‌ची 90 एम.एल.ची सिलबंद बाटली सीए तपासणी कामी बाजुला काटुन त्यावर आमच्या व पंचाच्या सहीच्या चिट्टया लावुन त्यावर पोस्टेचे लाखसील मोहर करुन राखुन ठेवल्या. बाकी प्रो. गुन्हयाचा माल गुन्हयाचे तपास कामी जप्त करून ताब्यात घेतला तसा सविस्तर जप्ती पंचनामा पंचासमक्ष आम्ही केला.

तरी आज दिनांक 19/11/2024 रोजी 22:35 वाजण्याचे सुमारास नविन रेणापुर नाका येथील मनपाचे पाणी फिल्टरचे समोर रोडच्या साईडला ईसम नामे दत्ता नरसिंग चव्हाण वय 31 वर्षे रा.नविन रेणापुर नाका, भक्ती नगर लातुर हा त्यांच्या ताब्यातील एक लाल काळया रंगाची aprilia कंपनीचे स्कुटी क्र. एमएच 23 एक्यु 6669 चे डिगीमध्ये विना पास परवाना देशी दारुची चोरटी विक्री व्यवसाय करण्याच्या उददेशाने अवैध रित्या विक्री करीत असतांना एकूण 37,775/-रुपयाचे माल कब्ज्यात बाळगलेले मिळून आले आहेत म्हणून माझी त्यांच्या विरुध्द कलम 65 (अ) (ई) महाराष्ट्र दारुबंदी कायदया प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. सोबतः- जप्ती पंचनामा, मु‌द्देमाल व एक आरोपी,

Post a Comment

أحدث أقدم