भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर घरमालकाने घराचा ताबा मिळणेसाठी भाडेकरूला पाठविणेची नोटीस
(आर पी ए डी ने रवाना)
अॅडव्होकेट,
रा.-
दिनांक-
प्रति,
श्री--
रा--
आमचे अशिल श्री./सौ. / श्रीमती / मे--- रा. माहिती व अधिकारावरून तुम्हास नोटीस देणेत येते ती खालीलप्रमाणे • यांनी दिलेल्या लेखी, तोंडी
आमचे अशिलांचे मालकीची घर मिळकत नं भाडेपट्टा तुम्ही व आमचे अशिल यांचेमध्ये दिनांक (मिळकतीचे वर्णन) असून सदर मिळकतीचा रोजी झालेला आहे. सदरची मिळकत यापुढे भाडेपटट्याने दिलेली मिळकत समजणेत येईल. सदरच्या मिळकतीच्या भाडेपट्ट्याचा कालावधी दिनांक रोजी पूर्ण झाला असून आपणास या नोटीसीने कळविणेत येते की, सदर मिळकत आपण दिनांक पर्यंत रिकामी करून सदर मिळकतीचा शांततापूर्वक कब्जा आमचे अशिलांना परत करावा. तसे न केल्यास आमचे अशिल आपले विरूध्द भाडेकरारातील अटींचा / शर्तीचा भंग केला म्हणून तसेच सदर मिळकतीचा कब्जा परत मिळवणेसाठी तसेच आपण हेतू पुरस्पर आमचे अशिलांची मिळकत न सोडल्याने त्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मागणेसाठी ते मे. कोर्टात दावा दाखल करतील व त्याचे होणाऱ्या खर्चास व परिणामांस सर्वस्वी तुम्हीच जबाबदार रहाल.
या नोटीसीचा खर्च र.रू. (र.रू. ---) तुमचेवर ठेवून व नोटीसीची स्थळप्रत आमचेकडे ठेवून ही नोटीस तुम्हांस रजिस्टर्ड पोस्टाने पाठविली.
स्थळ
दिनांक :
अशिलातर्फे अॅडव्होकेट
إرسال تعليق