लातूर : आरोपींनी संगनमत करून
फिर्यादीला विनाकारण शिवीगाळ करून कोयत्याने मारून जखमी केल्याची घटना मोती नगर येथे २५ डिसेंबर रोजी घडली. याबाबत तिघांविरुद्ध गांधी चौक पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी ओम कुमार यादव (राहणार विक्रमनगर, लातूर) यांना विनाकारण शिवीगाळ करण्यात आली. याबाबत विचारणा केली असता आरोपीने कोयता काढून फिर्यादीच्या अंगावर गेला. फिर्यादीने उजवा हात समोर केल्याने हाताच्या बोटावर जखम झाली आहे. अन्य एकाने दगडाने मरून जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, असे ओम कुमार यादव यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार व ओम उमाकांत कसबे व अन्य दोघाविरुद्ध दोघेही (रा. गांधीनगर लातू) यांच्याविरुद्ध गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सर्वदा करीत आहेत.
إرسال تعليق